बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुंबईत सगळं काही ब्रिटिशांनी केलं, मग शिवसेनेनं काय केलं?”

पुणे | दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याचं चित्र संपूर्ण मुंबईत पाहायला मिळालं. सध्या मुंबईत साचलेल्या पाण्याच्या मुद्द्यावरून मुंबई महानगरपालिकेवर व विशेषत: शिवसेनेवर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका होत असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टिकास्त्र डागलं आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका करताना मुंबईत आतापर्यंत सगळं काही ब्रिटिशांनी केलं आहे मग एवढे वर्ष शिवसेनेनं नेमकं काय केलं? असा खोचक सवाल विचारला आहे. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

दरम्यान, मुंबईमध्ये राणीची बाग ब्रिटिशांनी तयार केली, म्हातारीचा पुलही ब्रिटिशांनी तयार केला. सगळं काही मुंबईत ब्रिटिशांनी केलं असताना शिवसेनेनं मुंबईत नेमकं काय केलं? असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेवर घणाघात केल्याचं पाहायला मिळालं. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हं दिसून येत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून चंद्रकांत पाटील यांच्या महाविकास आघाडी सरकारमधील विविध पक्षांच्या नेत्यांबरोबर शाब्दिक चकमकी उडत असल्याचं पाहायला मिळालं, त्यातच आता चंद्रकांत पाटील यांनी थेट शिवसेनेवर हल्लाबोल करत पुण्यातील कार्यक्रमात थेट प्रश्न विचारला आहे. आता यावर शिवसेना नेमकं काय उत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

कोरोना लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर; तब्बल 50 लाखांहून अधिक लोकांनी घेतला लसीचा दुसरा डोस

कौतुकास्पद! ‘या’ अभिनेत्यानं दत्तक घेतलेल्या गावात राबवली लसीकरण मोहिम

“वाघ आता पिंजऱ्यातला झालाय, आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती”

कोरोना लस घेतल्यावर बेशुद्ध झाला व्यक्ती अन्…, पाहा मजेशीर व्हिडीओ

अनाथांना 1 टक्के आरक्षण मिळणार?; आजच्या कॅबिनेट बैठकीत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More