मुख्यमंत्र्यांच्या अधिवेशनाच्या भाषणातील राज्यातील 3 महत्वाचे मुद्दे व प्रश्न सांगा आणि बक्षीस मिळवा!
मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्याच्या भाषणातील राज्याचे 3 महत्वाचे मुद्दे आणि प्रश्न सांगा मी तुम्हाला बक्षीस देईल. अशा शब्दात मुख्यमंत्र्याच्या अधिवेशनातील भाषणाची खिल्ली उडविली आहे.
“मुख्यमंत्र्याच्या आजच्या भाषणाला काहीच अर्थ नव्हता. या भाषणाला राजकीय म्हणता येणार नाही. राज्याचा विषय सोडून ते इतर सर्व विषयावर बोलले. शेतकऱ्यांबद्दल त्यांनी एक शब्दही काढला नाही” अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते काल प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आमचा म्हणजेच विरोधी पक्षाचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आम्हाला सभागृहात बोलू दिलं जात नाही. मुख्यमंत्र्यांना आम्ही उघडकीस आणलेला गैरप्रकार आणि भ्रष्टाचार ऐकून घ्यायचा नाही तसेच हे सर्व केल्यामुळे आम्हाला महाराष्ट्रद्रोही म्हटलं जातं. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना अनेक चर्चा आणि वाद घडून येत आहे. विरोधक आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची खडाजंगी दररोज अधिवेशनादरम्यान पाहायला मिळत आहे
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मुख्यमंत्र्याच्या भाषणावर टीका करताना ते शर्जिल उस्मानी ज्याने हिंदुना सडका बोलला त्याच्यावर एक शब्दही काढला नसुन त्याच्यावर बोलण्याची त्यांची हिंमत नाही असं फडणवीस बोलले. महाराष्ट्रातील प्रश्नावर बोलायचं सोडून इतर सर्व प्रश्नांवर बोलण्याचं धाडस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. पण ते स्थानिक मुद्दे आणि प्रश्नावर बोलले नाहीत. अशी सडकून टीका विरोधी पक्षाने उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
थोडक्यात बातम्या-
पुणेकरांनो सावधान! ‘कोरोना’ शहरात फोफावतोय, पाहा आजची आकडेवारी
विधानसभेत आज एक ‘कॉमेडी सम्राट’ पाहिला- नितेश राणे
“दारू पिऊन जीवे मारण्याच्या धमक्या देण्यातच बलात्काऱ्यांच्या समर्थकांचा पुरूषार्थ उरला आहे का?”
…म्हणून महिला पोलिसाने दिली आपल्या पतीची सुपारी
‘सरकारला लाज वाटली पाहिजे’; प्रकाश राज यांची मोदी सरकारवर टीका
Comments are closed.