Top News महाराष्ट्र मुंबई

…नाहीतर काँग्रेस लवकरच इतिहास जमा होईल- चंद्रकांत पाटील

Photo Credit- Facebook/ Chandrakant Patil

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नईमध्ये स्वदेशी बनावटीचा हायटेक रनगाडा लष्कराला सुपूर्त केला. यामुळे देशाची संरक्षण व्यवस्था आणखी बळकट झाली आहे. यामुळे वारंवार भारताच्या संरक्षण मंत्रालयाचा अपप्रचार करणाऱ्या राहूल गांधींचा खोटारडेपणा समोर आला असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राहुल गांधींवर केली आहे.

काँग्रेस खोटारडेपणाच्या राजकारणामुळे ४०० जागांवरुन ४० जागावर आली आहे. भविष्यातही अशीच परिस्थिती राहिली तर काँग्रेस हा पक्ष लवकरचं इतिहासजमा होईल. त्यामुळे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी या गोष्टींचं लवकरच आत्मचिंतन करणं गरजेचं आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

२०१८ मध्येही राहुल गांधी यांनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना मोदी यांच्या कार्यपद्धतीबद्दल चुकीची माहिती देऊन मोदींचा बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. पंतप्रधान मोदी एचएएलसारख्या कंपन्यांची उत्पादन क्षमता कमी करत असल्याची चुकीची माहिती दिली होती. त्यांची ही वक्तव्ये म्हणजे देशाच्या संरक्षण खात्याला बदनाम करण्याचा प्रकार असून हे निंदनीय आहे, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, चीनच्या कथित मदतीने भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्यास एक दिवस जनताच तुमच्या खोटारेडपणाचा पर्दाफाश करेल आणि ही वेळ दूर नाही, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

“देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे आता जोडीने मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहत बसतील”

‘…पण भाड्याचं घर शेवटी भाड्याचं असतं’; कंगणा राणावतचा ट्विटरला टोला ‌

‘भाजप नेत्यांची महिलांबाबत डझनभर प्रकरणं मला माहित’; विजय वडेट्टीवारांचा गौप्यस्फोट

जेव्हा नाचायला लागली शालू… सोशल मीडियावर पोरं झाली चालू, पाहा व्हिडीओ

सावधान! पुणे जिल्ह्यात कोरोना पुन्हा पसरतोय हातपाय; पाहा सविस्तर आकडेवारी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या