बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सरसकट निवडणुका रद्द करा”, चंद्रकांत पाटलांची आक्रमक भूमिका

मुंबई | सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) ओबीसी आरक्षणाला (OBC reservation) स्थगिती दिल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi government) आणि विरोधी पक्ष भाजपच्या (BJP) नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतूरा रंगला आहे. अशातच आता आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे.

ठाकरे सरकारनं ओबीसी आरक्षणासंदर्भात काढलेला अध्यादेश सर्वोच्च न्यायालयानं स्थगित केल्यानंतर राज्यात ओबीसी आरक्षणाबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. अशातच राज्य निवडणूक आयोगानं राज्यात घोषित झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी जागांची निवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपलं मतं मांडलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करण्यात याव्यात अशी मागणी पाटील यांनी केली आहे. निवडणूक आयोगाच्या उर्वरित जागांच्या निवडणूक घेण्याच्या निर्णामुळं राज्यात राजकीयच नाही तर सामाजीक पेच सुद्धा निर्माण होत आहेत, असं वक्तव्य पाटील यांनी केलं आहे. तसेच पाटील यांनी निवडणुकीनंतर निर्माण होणाऱ्या सत्तास्थापनेच्या गणिताची सुद्धा आठवण आयोगाला करून दिली आहे.

दरम्यान, ओबीसी समाजाच्या 27 टक्के राजकीय आरक्षणाची लढाई इम्पेरिकल डाटाच्या कचाट्यात सापडली आहे. ठाकरे सरकार केंद्राला दोषी ठरवत आहे. तर भाजपनं ठाकरे सरकारला दोषी ठरवलं आहे. अशात फक्त ओबीसी समाजाची हानी होत आहे हे मात्र नक्की.

थोडक्यात बातम्या 

“हेच का तुमचे संस्कार?”, व्हिडीओ शेअर करत जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका

राहुल गांधींच्या भेटीनंतर संजय राऊत म्हणाले, “मी त्यांना सांगितलंय की, काँग्रेसशिवाय…”

…अन् अभिनेत्री समंथा म्हणाली, “मग मी सेक्स निवडेल”

राज्यात कडाक्याची थंडी! येत्या 2 दिवसात तापमानाचा पारा आणखी घसरणार

जमलं बघा! हर्षवर्धन पाटलांची लेक होणार बाळासाहेब ठाकरेंची नातसून

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More