Top News कोल्हापूर महाराष्ट्र

चंद्रकांतदादा आणि देवेंद्र फडणवीस म्हणत असतील ‘काश आज ईव्हीएम होता’- हसन मुश्रीफ

कोल्हापूर | पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये जोरदार मुसंडी मारल्यानंतर आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

चंद्रकांतदादा आणि देवेंद्र फडणवीस म्हणत काश आज ईव्हीएम मशीन होता, असं मुश्रीफ म्हणाले. तसंच मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर सत्य समोर येतं असं म्हणत अप्रत्यक्षरीत्या ईव्हीएमवर आक्षेप नोंदवला.

लोकांचा ईव्हीएम मशीनवर विश्वास राहिला नसल्याचं देखील हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. अनेक प्रगत देशात आज देखील बॅलेट पेपरवर निवडणुका होतात. मात्र आपल्या देशात ईव्हीएमवर निवडणुका घेतल्या जातात, असं मुश्रीफ यांनी सांगितलं.

विजय हा विनयाने स्वीकारायचा असतो. भाजपने सत्तेचा उपयोग सूड उगवण्यासाठी केला. त्यामुळे सुशिक्षित मतदारांनी भाजपला नाकारलं आहे. भाजपने आता विचार करण्याची गरज आहे, असा सल्लाही मुश्रीफ यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या-

शीतल आमटेंच्या आत्महत्याप्रकरणी अत्यंत धक्कादायक माहिती समोर!

शरद पवार यांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी?

 ‘एका वर्षात दोनदा सुतक लागणं हे हिंदू शास्त्रानुसार चांगलं नाही’; शिवसेनेचा भाजपला टोला

‘सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल, तर…; या काँग्रेस नेत्याचा शिवसेना आणि राष्ट्रवादीला इशारा

“महाविकास आघाडीने भाजपची कबर खोदायला सुरुवात केलीये”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या