Top News राजकारण

“पोपट घेऊन चंद्रकांत पाटील यांनी चिठ्ठ्या काढल्या; मात्र चिठ्ठ्यांची भविष्यवाणी खोटी ठरली”

मुंबई | अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधलाय. चंद्रकांत पाटील यांच्या चिठ्ठ्यांची भविष्यवाणी खरी ठरली नसल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलंय.

नवाब मलिक म्हणाले, “सरकार पडणार असं सांगणारी ज्योतिष विद्या खरी नाही हे सिद्ध झालंय. पोपट घेऊन चंद्रकांत पाटील चिठ्ठ्या काढत होते मात्र त्या चिठ्ठ्यांची भविष्यवाणी खरी झाली नाही.”

ठाकरे सरकार हे पूर्णपणे अपयशी, गोंधळलेलं आणि दिशा नसलेलं सरकार आहे. वर्षभर तुम्ही कसं काम करता, ते जनतेने पाहिलं. आता जमत नाही म्हणा आणि सोडून द्या, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.

त्यांच्या या वक्तव्याला नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलंय. शिवाय महाविकास आघाडी सरकार 5 वर्षं पूर्ण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

महत्वाच्या बातम्या-

आता विनामास्क आढळण्यास थेट अटक होणार; ‘या’ राज्य सरकारचा निर्णय

फेरीवाले आणि दुकानदारांची होणार कोरोना चाचणी; मुंबई महापालिकेचा निर्णय

राज्यात दिशा कायदा केव्हा लागू होणार?; मनसेचा गृहमंत्र्यांना सवाल

संजय राऊत यांच्या नातेवाईकांना ईडीच्या नोटीसा; नितेश राणेंचा दावा

“विरोधकांनी रोज उठून बोटं मोडली म्हणून हे सरकार बदलत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या