“आम्ही मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलंय”
मुंबई | शिवसेनेत बंड करुन शिवसेनेचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आपल्या गटाच्या 40 आमदारांसोबत भाजप पक्षासोबत गेले आणि त्यांनी सरकार स्थापन केलं. भाजप पक्षाकडे 105 आमदार असल्याने वास्तविक ते या युतीत मोठा पक्ष आहेत, असं असून देखील क्रमांक दोनचा पक्ष असणाऱ्या शिंदे गटाला मुख्यमंत्रीपद मिळतं म्हणजे काय?, असं म्हणत सर्वांच्या भुवया उंचावल्या आणि चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
त्याच्यावर आता भाजपचे नेते आणि माजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भाष्य केलं आहे. पनवेल येथे भाजप कार्यकर्त्यांची बैठक सुरु होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), प्रवीण दरेकर आणि पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मनावर दगड ठेऊन आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय घेतला, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.
काळजावर दगड ठेवत, देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वाने दिलेला निर्णय मान्य केला. केंद्राच्या निर्णयाने एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. याचे फार दु:ख झाले. तरी नेेतृत्वाने दिलेला निर्णय मानन्यावाचून गत्यंतर नव्हते. त्यांचा निर्णय मान्य करुन राज्याचा गाडा पुढे न्यायचा आहे. हे सरकार सत्तेत येणं अत्यंत गरजेचं होतं, असं पाटील यावेळी म्हणाले.
शिवसेनेने मोहन भागवत यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे हे सरकार होणं गरजेचं होतं. ते आता तयार झालं आहे. आगामी काळात आपल्याला मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) निवडणूक जिंकायची आहे. त्याकरिता आता तयारीला लागले पाहिजे. आगामी काळात आपण भरपूर परिश्रम घेऊ, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
थोडक्यात बातम्या –
“ऊस उत्पादकांमुळे शरद पवारांच्या पुतण्या आणि नातवांचे कारखाने निघाले”
संधी सोडू नका! iPhone 13 वर मिळतोय आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट
शिंदे सरकारचा महाविकास आघाडीला आणखी एक झटका!
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारकडून मिळणार मोठं गिफ्ट
प्रसिद्ध गायक अदनान सामीनं उचललं धक्कादायक पाऊल!
Comments are closed.