बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काय सांगता? …म्हणून चंद्रकांत पाटलांनी पुण्यातील अधिकाऱ्याला दिलं चॅाकलेट!

पुणे | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सत्ताधारी पक्षावर कोणत्या ना कोणत्या विषयावरून टीका करत असतात. पाटील आपल्या स्पष्ट वक्तेपणामुळे कायम चर्चेत असलेले पाहायला मिळतात. अशातच पाटलांचं वेगळं रूप पाहायला मिळालं आहे. रस्त्याच्या कामाच्या पाहणी करण्यासाठी गेल्यावर त्यांनी अधिकाऱ्याला चॉकलेट दिलं आहे.

चंद्रकांत पाटलांनी कशामुळे चॉकलेट दिलं?, असा प्रश्न प्रत्येकाला पडला असावा त्याच्या मागचं कारण असं की, पुण्यातील चांदणी चौकातील रस्त्याची पाहणी करण्यासाठी ते आले होते. पाहणी झाल्यावर चंंद्रकांत पाटील यांनी तेथील अधिकाऱ्यांना चॉकलेट दिलं.

पावसाळा चालु झाला की चांदणी चौकामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. खड्डे पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. आदेश दिल्यानंतर आठ दिवसांनी पाहणीसाठी रात्री 10 वाजता आले. त्यावेळी त्यांना काही प्रमाणात खड्डे बुजवल्याचं दिसलं. त्यावेळी त्यांनी काम पाहून अधिकाऱ्यांना चॉकलेट दिलं.

दरम्यान, अद्याप खड्डे बुजवण्याचं काम पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे आपण 24 ऑगस्टला पुन्हा पाहणी करण्यासाठी येणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

बाबो! लॉर्ड्सवर झालेल्या पराभवानंतर इंग्लंडच्या ‘या’ बड्या खेळाडूने सोडला संघ

नारायण राणे संतापले; म्हणाले, “मांजरीसारखं मला आडवं येऊ नका!”

भाजप शहराध्यक्षाकडे उधारी मागणारी कमेंट अन् राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

नेक्सॉनच्या यशानंतर येतेय टाटांची ‘ही’ इलेक्ट्रीक गाडी, फक्त 21 हजार रुपये…

राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More