बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘रोज उठून त्यांचं नाटक चाललंय’; चंद्रकांत पाटील संजय राऊतांवर भडकले

मुंबई | सीबीआयने अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह 10 ठिकाणी छापे मारले आहेत. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापा मारला आहेत. अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या कारवाईनंतर आता महाराष्ट्रात राजकारण पेटलं आहे. महाविकास आघाडीचे नेते अनिल देशमुख यांच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

संजय राऊत यांनी रोज उठून आम्हाला भाषण, प्रवचन देऊ नये. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले तर संजय राऊत लगेच टीका करतात. हेच उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्याबाबतीत केलं तर आम्ही प्रयत्न करत असल्याचं ते सांगतात. मग केंद्र सरकार काय झोपा काढतंय का? हा दुटप्पीपणा चालणार नाही, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांना खडसावलं आहे.

संजय राऊत यांचं रोज उठून नाटक चाललंय. मांजर डोळे मिटून दूध पिते म्हणजे कोणीही तिला बघत नाही, असं तिला वाटतं. हाच प्रकार संजय राऊत यांना लागू पडतो. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर एका महिलेने आरोप केलेले आहेत. या आरोपांची केंद्रीय महिला आयोगाने चौकशी करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, सचिन वाझेच्या पत्रात संजय घोडावत आणि अजित पवार यांचा उल्लेख आहे. मला थेट अजित पवार यांचं नाव घ्यायचं नाही. मी केवळ अनिल परब आणि संजय घोडावत यांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, एवढंच म्हणत आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“लवकरच आणखी एका मंत्र्याची अवस्था अनिल देशमुखांसारखी होईल”

“खरा सचिन वाझे मंत्रालयावर होता की सिल्वर ओकवर?”

मला डायरेक्ट मेसेज करा, शक्य होईल तेवढी मदत मी करेन- रिया चक्रवर्ती

“अनिल देशमुखांवर झालेली कारवाई ही सोची समझी चाल, लवकरच दूध का दूध पाणी का पाणी होईल”

अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल; संजय राऊत म्हणाले ‘कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More