बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोलांटीउड्याच्या स्पर्धेत माकडही मागं पडतील, अधिवेशन आलं की यांची तब्येत बिघडते”

मुंबई | राज्याच्या धोरणात्मक निर्णयासाठी विधीमंडळ अधिवेशन हे खूप महत्त्वाचं असतं. गेल्या पावणेदोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं अधिवेशन घेण्यास अडथळे येत होते. अशातच हिवाळी अधिवेशन (Winter session) येत्या 22-28 डिसेंबरदरम्यान भरवण्यात येणार आहे. त्यावरून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. (Chandrakant Patil has criticized the Mahavikas Aghadi government)

कोलांटीउड्या मारण्याच्या स्पर्धेत एखादे निष्णात माकडही मागे पडेल इतक्या कोलांटीउड्या या महाभकास सरकारने आजवर मारल्या असून, या कोलांटीउड्या म्हणजे मविआ सरकारच्या धोरणशून्यतेचे पुरावे आहेत. दोन लाखांवरील कर्जमाफीचा आपला निर्णय रद्द करत या सरकारने अशीच एक कोलांटीउडी मारली आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

मविआ सरकार प्रचंड घाबरलं आहे, हे आता स्पष्ट दिसून येत आहे. आपल्या अपयशामुळे अधिवेशनाकडेही सतत पाठ फिरवणाऱ्या सरकारने हिवाळी अधिवेशनाची तारीख जरी निश्चित केली असली, तरी एकच दिवस चर्चासत्र का? राज्यात यांनी असंख्य प्रश्न निर्माण केले आहेत, त्यावर विरोधी पक्ष प्रहार करणारच, अशा इशारा देखील पाटलांनी यावेळी दिला आहे.

दरम्यान, अधिवेशन आले की यांच्या मंत्र्यांची तब्येत बिघडते. दरवर्षी नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेतले जात आहे. राज्यात हाहाकार मांडायचा पण त्यावर बोलायचं नाही आणि इतरांनी प्रश्न विचारले की त्याकडे दुर्लक्ष करायचं. भोंगळ कारभार मांडायचा आणि अधिवेशनाला घाबरायचं, हाच यांचा व्यवहार असल्याची टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

दिलासादायक! जगाला टेन्शन देणाऱ्या ओमिक्रॉनवर येणार प्रभावी लस

ट्विटरचा मोठा निर्णय, भारताचे पराग अग्रवाल नवे सीईओ

राज्यातील निर्बंध वाढवणार का?, राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य

खळबळजनक! सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांच्यात तासभर चर्चा, काँग्रेस आक्रमक

अभिजीत बिचुकले म्हणतात, “मी कुणाच्या बापाला घाबरत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More