बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘गाव जेवण एक दिवस देणार की तीन वर्षे?’; अशोक चव्हाणांचा खोचक सवाल

नांदेड | नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारासाठी मतदारसंघ चांगलाच पिंजून काढताना दिसत आहेत.

चंद्रकांत पाटील यांनी प्रचारादरम्यान एक मतदारांना ऑफर देत म्हणाले, की तुम्ही भाजपला आघाडी द्या मी तुम्हाला गाव जेवण देतो. पाटील यांच्या ऑफरची सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पाटलांच्या गाव जेवणाची खिल्ली उडवली आहे.

चंद्रकांत पाटील हे एक दिवस गाव जेवण देणार आहेत, की तीन वर्षे असा सवाल अशोक चव्हाण यांनी पाटील यांना केला आहे. तसेच चंद्रकांत पाटलांच्या हातात काहीच नाही, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी मतदारांना ऑफर देणं हे काही नवीन नाही. त्यांनी सांगली महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान कार्यकर्त्यांना बोलताना म्हणाले होते, की तुम्ही दोन छोटे शॉक दिले आहेत. आता एकदा एक मोठा शॉक द्या. तुमचा सोन्याचा मुकूट घालून सत्कार करतो, अशी ऑफर पाटील यांनी दिल्याचं अशोक चव्हाणांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या –

“मी शरद पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता, मेलो तरी त्यांना सोडणार नाही”

‘शशिकांत शिंदेंना भाजप 100 कोटींची ऑफर देईल असं मला वाटत नाही’; प्रविण दरेकरांचं शिंदेंना प्रत्युत्तर

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट; विविध विषयांवर अर्धा तास चर्चा

‘आम्ही रात्री 1 वाजेपर्यंत वाट पाहिली, तुमचं हे काय चाललंय?’; न्यायालयाने योगी सरकारला फटकारलं

“निवडणुकीत तुम्ही भाजपला आघाडी द्या, मी तुम्हाला गाव जेवण देतो”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More