बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठा समाजाच्या भवितव्याशी खेळणं सरकारनं बंद करावं – चंद्रकांत पाटील

मुंबई | बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या बाबतीत एक महत्वपुर्ण निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण घटनाबाह्य ठरवत मराठा आरक्षण कायदा रद्द करण्याचा निर्णय दिला. यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर भाष्य केलं. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निराशाजनक आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

बुधवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दूरचित्रवाणीवरील भाषण मोठ्या अपेक्षेनं ऐकलं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी ते काही भरघोस उपाय जाहीर करतील, अशी अपेक्षा होती. किमान ठाकरे सरकारने चुका केल्यामुळे मराठा समाजाचे असलेले आरक्षण हातचे गेले त्याबद्दल क्षमा याचना तरी करतील, असं वाटलं होतं. पण प्रत्यक्षात त्यांनी काय केले तर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्याची घोषणा केली. त्यांनी एका शब्दाने दिलगिरी व्यक्त केली नाही, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला आहे. मराठा समाजासाठी आता ठाकरे सरकार काय करणार तर केंद्र सरकारला पत्र पाठवून मागणी करणार, हा निराश करणारा दृष्टिकोन आहे. मराठा समाजातील तरुण–तरुणींना आरक्षण मिळेपर्यंत शिष्यवृत्ती, वसतिगृहे, व्यवसायासाठी अत्यंत कमी व्याजदराचे कर्ज आणि मार्गदर्शन अशा प्रकारे मदत भाजपा महायुती सरकारने केली होती, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, या सरकारमधील मोठ्या घटकाला मराठा समाजातील सामान्यांना मदत केलेली नको आहे, त्यांचा दबाव मुख्यमंत्र्यांवर दिसत आहे. केंद्र सरकारच्या निवेदनाचा वापर करून राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयातच सुनावणीच्या वेळी आग्रही भूमिका मांडली असती तर आज विरोधी निकाल लागला नसता, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

आमदार असावा तर असा; अन्… ‘या’ आमदाराचा चक्क कोविड सेंटरमध्येच मुक्काम

मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा गेल्या 24 तासातील धक्कादायक आकडेवारी

“आदु… तुझ्या पप्पांनी केंद्र सरकारकडून तुझ्यासाठी बायकोच मागायची सोडली फक्त”

एकाच तरुणीवर दोन गुंडांचं जडलं प्रेम, तरुणीने नकार दिल्यानंतर घडला धक्कादायक प्रकार

मुख्यमंत्र्यांच्या आजच्या संवादातील सर्व महत्त्वाचे मुद्दे वाचा एकाच ठिकाणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More