बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सत्तेचा गैरवापर याआधी झाला नसेल तर सुप्रिया सुळेंनी वडिलांना विचारायला हवं”

मुंबई | राज्यातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेनेच्या काही नेत्यांवर सध्या ईडीची टांगती तलवार आहे. शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादीचे नेते आणि गृृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीची नोटीस आली आहे. यावरून राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुळे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवसेना खासदार भावना गवळी आणि आमदार अनिल परब यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागल्यानंतर भाजपने त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करत असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती. या टीकेवर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी नागपूर येथे सुळेंवर पलटवार केला आहे.

सुप्रिया सुळेंना असं वाटत असेल की, सत्तेचा गैरवापर याआधी कधी झाला नसेल तर त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारायला हवं की,  इंदिरा गांधी यांच्या सरकाराच्या काळात सत्तेचा गैरवापर कसा केला, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आता राहिलेली नाही आहे. शिवसेना ही हिंदूत्ववादी होती. जर शिवसेना हिंदूत्ववादी असती तर त्यांनी टिपू सुलतान जंयती साजरी केली नसती. मुख्यमंत्री जनआशीर्वाद यात्रेवर काहीही बोलू शकतात. त्याचबरोबर कोकणात जनआशीर्वाद यात्रेला भरपूर प्रतिसाद मिळाला आहे, असं पाटील यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘स्टेनगन’ थंडावली! चांगल्या-चांगल्या फलंदाजांच्या तोंडचं पाणी पळवणारा डेल स्टेन निवृत्त

“घंटानाद करा, नाही तर आणखी कसला नाद करा, पण आमचा नाद करू नका”

ख्रिस्तियानो रोनाल्डोची घरवापसी, दोन वर्षाच्या कराराची किंमत ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

‘…अन्यथा कडक निर्बंध लावावे लागतील’; एकनाथ शिंदेचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने मांस, दारू विक्रीबाबत मथुरेमध्ये आदित्यनाथांनी घेतला मोठा निर्णय!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More