बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबियांना 10 लाख अन् नोकरी कधी?? चंद्रकांत पाटील म्हणतात…

मुंबई |  न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण तर दिलं पण राज्य सरकार मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबियांना 10 लाख अन् नोकरी कधी देणार? असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

आंदोलन करणारे तरूण महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे कधी घेणार? असे प्रश्न विरोधी पक्षाने उपस्थित केले. यावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

गुन्ह्यासंदर्भात जिल्ह्याचे एसपी आणि कलेक्टर यांची एक समिती असते. ते त्यांचा अहवाल राज्य सरकारला देते. दिलेल्या अहवालापासून न्यायिक प्रक्रिया पूर्ण होत असते आणि ती आत्ता सुरू आहे, असं पाटील म्हणाले.

मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना नोकरी आणि 10 लाखांची मदत, याबाबत सोमवारी माहिती घेऊन सविस्तर उत्तर देऊ, असं पाटील यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-जगभरात शमीचं कौतुक; मात्र बायको म्हणते याला लाजच नाही!

-म्हणून लोकसभेत काँग्रेसचा पराभव झाला; ज्येष्ठ नेत्याने दिला पक्षाला घरचा आहेर

-अमली पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतुद करा- अजित पवार

-भारत-अमेरिकेेचे संबंध आणखी मजबूत होतील- नरेंद्र मोदी

-आमदारांचं 1 टक्का आरक्षण कमी करा अन् अनाथांना द्या; बच्चू कडूंची विधानसभेत मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More