नागपूर | पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांचं मंत्रिपद जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात महत्त्वाचा खुलासा केला आहे.
कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतानाही एखादा व्यक्ती 6 महिने मंत्रिपदी राहू शकतो, त्यामुळे जानकरांच्या मंत्रिपदाला धोका नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
महादेव जानकर यांनी नुकताच आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी रासपच्या एबी फॉर्मवर नवा अर्ज भरला आहे, त्यामुळे भाजप त्यांना तारणार की नाही?, यावर जानकरांचं भवितव्य अवलंबून आहे.
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलै रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी रासपचे नेते महादेवराव जानकर यांनी भाजपच्या कोट्यातून, मात्र रासपच्या एबी फॉर्मवर निवडणूक लढवण्याची संधी द्यावी अशी विनंती भाजप पक्षश्रेष्ठींकडे केली होती. pic.twitter.com/Dm8lguX9q9
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) July 6, 2018
पण तत्पूर्वी मा. महादेव जानकर यांनी भाजपच्या आमदारकीचा राजीनामा पक्षाकडे सादर करुन उमेदवारी अर्ज भरला. यामुळे घटनेनुसार, त्यांच्या मंत्रीपदाला कोणताही धोका नाही. घटनेनुसार किमान सहा महिने ते मंत्रीपदावर राहू शकतात.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) July 6, 2018
महत्त्वाच्या बातम्या–
-भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना शरम वाटली पाहिजे- शरद पवार
-शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात इंग्लंडचा विजय
-संभाजी भिडेंनी आम्हाला शब्द दिलाय; शिवसेनेचा दावा
-मुख्यमंत्री सहाय्यता निधी लाटण्याचा भाजप कार्यकर्त्यांचा डाव फसला, गुन्हे दाखल
-ख्रिश्चनांच्या देशप्रेमाबद्दल शरद पवारांचं मोठं वक्तव्य!