पुणे | गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार अंतर्गत वादाने कोसळणार, असा दावा विरोधी पक्षांकडून केला जात आहे. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर येत्या 10 मार्चपर्यंत महाविकास आघाडी जाणार, असं सांगितलं होतं. त्यावरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रकांत पाटील हे मोठे व्यक्ती आहेत. मी लहान कार्यकर्ता आहे. त्यावर काय बोलणार?, असं म्हणत अजित पवारांनी टोला लगावला आहे. यावेळी अजित पवार यांनी अर्थसंकल्पाबाबत वक्तव्य केलं आहे. राज्याच्या आगामी अर्थसंकल्पामध्ये आम्ही समाजातील गरिब घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच विधानसभेतील 12 आमदारांच निलंबन मागे घेण्यामागे राज्य सरकारचा काही संबंध नसल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे.
विधानसभेतील 12 आमदारांच्या निलंबनाबाबत बोलताना अजित पवार यांनी हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा असल्याने आम्हाला त्याचं पालन करावं लागतयं, असं सांगितलं आहे. तसेच राहुल बजाज यांच्या उद्योग क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचा स्वभाव स्पष्टवक्ता होता. उद्योग करताना सामाजिक क्षेत्रासाठी काय करता येईल, याचा ते नेहमी विचार करायच , असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील मतभेद आता उफाळले आहेत. महाविकास आघाडीचे नेते एकापाठोपाठ तुरूंगात जात आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा 10 मार्चला लागल्यानंतर महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून जावं लागेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. महाविकास आघाडीची सध्याची स्थिती पाहिली की, कोणीही विश्लेषण करणारा सांगेल की, हे सरकार फार काळ टिकणार नाही, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं होतं.
थोेडक्यात बातम्या-
“तुमच्या राज्यात मला जगायची इच्छा राहिली नाही”
काय सांगता??? फक्त 7 ते 8 रुपयात 100 किमी धावणार, ‘ही’ गाडी धमाल करणार!
प्रीति झिंटाने शाहरुख खानला विकत घेतलं, आर्यन-सुहाना बघतच राहिले
“अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेमधून बाहेर जावं लागेल”
“यमदेव घेऊन जातो तेव्हा त्याच्या जवळही रेडा असतो, म्हणूनच…”
Comments are closed.