Top News महाराष्ट्र मुंबई

‘…तर तुम्ही ते खुशाल सुरु ठेवू शकता’; चंद्रकांत पाटलांचं रश्मी ठाकरेंना पत्र

मुंबई | जर आपणास माझी ही विनंती योग्य वाटत नसेल आणि आपल्या सामना वृत्तपत्रातील भाषा योग्य वाटत असेल तर तुम्ही ते खुशाल सुरु ठेवू शकता, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी रश्मी ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.

वहिनी आपणाला या पत्राद्वारे मी एवढेच सांगू इच्छितो की, आपण सामना वृत्तपत्राच्या संपादक आहात. वृत्तपत्रात छापण्यात येणाऱ्या बातम्या , त्यातील भाषा या सर्वांसाठी आपण संपादक म्हणून जबाबदार असता. वहिनी मी आपणाला एक व्यक्ती म्हणून चांगलं ओळखतो आणि मला खात्री आहे की आपणालाही ही भाषा आवडत नसेल, असं पाटलांनी पत्रात म्हटलं आहे.

आपणाला या पत्राद्वारे मी एवढीच विनंती करु इच्छितो की, संपादक या नात्याने आपण आपल्या वृत्तपत्रात वापरण्यात येणाऱ्या भाषेचा विचार करावा, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी लिहिलेल्या पत्राला रश्मी ठाकरे काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

मी हा विचार कधीही केला नव्हता; ‘या’ गोष्टीबद्दल सनी लिओनीचा मोठा खुलासा

भाजमधून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ईडीच्या नोटीसही सोबत येतात- रूपाली चाकणक

भारत-ब्रिटन विमानसेवा 8 जानेवारीपासून होणार सुरु

“कोण रश्मी वहिनी? असं बहुतेक संजय राऊतांचं म्हणणं असावं”

“आता सत्ता महत्त्वाची की मराठी अस्मिता महत्त्वाची हे शिवसेनेने ठरवावं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या