Chandrakant Patil | राज्यातून मोठी बातमी समोर येत आहे. भाजपचे नेते आणि सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत. त्यांचा फोटो नुकताच व्हायरल झाला आहे. यावेळी उद्धव ठाकरेंसोबत शिवसेना नेते अंबादास दानवे आणि अनिल परब देखील होते. यावेळी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी अनिल परब यांना पेढा भरवला.
चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या दालनात उद्धव ठाकरेंच्या भेटीस सत्ताधारी नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आले होते. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक अधिवेशनाला उभे राहिले होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी अंबादास दानवेंना चॉकलेट भेट दिलं. तसेच त्यांनी उद्धव ठाकरेंना देखील चॉकलेट भेट दिलं.
यावेळी उद्धव ठाकरे, अंबादास दाने आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यात बातचीत झाली. यावेळी अनिल परब देखील उपस्थित होते. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मिठाई भरवत अनिल परब यांचं अभिनंदन केलं. दोघांमध्या काय चर्चा झाली याबाबत अद्यापही कोणतीही माहिती समोर आली नाही.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी अधिवेशनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. विशेष म्हणजे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरेंप्रमाणे अधिवेशनात विधानभवनात दाखल झाले आहेत. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी चॉकलेट देत स्वागत केलं.
शेतकरी प्रश्नावरून विरोधक आक्रमक
विधीमंडळात पावसाच्या अधिवेशनात आजपासून सुरूवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले. शेतकरी प्रश्नावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. विधानसभा परिसरात विरोधक आंदोलन करत असून जोरदार घोषणाबाजी करताना दिसत आहेत.
News Title – Chandrakant Patil Meet With Uddhav Thackeray Marathi News
महत्त्वाच्या बातम्या
सतर्क राहा! हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
उच्चांकी दरवाढीनंतर सोनं झालं स्वस्त; 10 ग्रॅमचे भाव फक्त..
सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा; 1 रुपयात पीक विम्याच्या नावाखाली मोठा घोटाळा समोर
…तर टीम इंडिया 16 महिन्यानंतर इंग्लंडचा वचपा काढणार?
पुणेकरांनो ‘या’ गोष्टी करताना शंभर वेळा विचार करा; पुणे पोलीस आयुक्त ॲक्शन मोडमध्ये