पुणे महाराष्ट्र

दिवेघाट अपघातातल्या जखमींचा खर्च भाजप करणार तर मृतांनाही मदत जाहीर

पुणे |  पुण्यााजवळच्या दिवे घाटात वारकऱ्याच्या दिंडीला अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. यावेळी जखमींचा खर्च भाजपतर्फे केला जाईल, असं त्यांनी  जाहीर केलं.

या अपघातात जखमी वारकऱ्यांच्या उपचाराचा खर्च भाजपकडून केला जाईल तर मृतांच्या कुटुंबियांना पक्षातर्फे प्रत्येकी 5  लाख रुपयांची मदत केली जाईल, असं चंद्रकांत पाटलांनी जाहीर केलं.

पुण्याजवळच्या दिवेघाटात संत नामदेव महाराज कार्तिकी वारी पालखी सोहळ्याच्या दिंडीला अपघात झाला. त्यात संत नामदेव महाराजांचे 17 वे वंशज सोपान महाराज नामदास यांचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत अतुल महाराज आळशी यांचाही मृत्यु झाला. तर काही जण जखमी आहेत.

दरम्यान, वारकऱ्यांच्या दिंडीला झालेल्या या अपघातवर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. जखमी वारकऱ्यांवर हडपसरमधल्या नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तिथे जात चंद्रकांत पाटलांनी जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली.

 

चंद्रकांत पाटील यांचं ट्वीट-

 

सर्वज्ञ आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर, माणिकबाग, पुणे

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या