सीमेवर जाऊन धुणीभांडी करण्याची माझी इच्छा- चंद्रकांत पाटील
पुणे | पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आपल्या अजब वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आताही त्यांनी असंच एक वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे त्यांची एकच चर्चा रंगली आहे. चक्क धुणीभांडी करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांच्यातर्फे स्त्री शक्ती सन्मान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि राजेश पांडे उपस्थित होते. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं.
सीमेवर जाऊन सैनिकांची सेवा करण्याची माझी फार पूर्वीपासूनची इच्छा आहे. सीमेवर जाऊन धुणीभांडी करण्यासही मी तयार आहे. राजकारण सोडण्याचा आग्रह झाल्यास मी सीमेवर जाऊन सैनिकांनी सेवा करेन, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, चंद्रकांत पाटील आपल्या अशाच वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. याआधी त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाल्यास मी हिमालयात जाईन, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन त्यांना मोठ्या टीकेचा सामना देखील करावा लागला होता.
Comments are closed.