बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अजितदादासोबत बांधावरची लढाई नाही, पण मी पक्षाबद्दल आणि मोदींबद्दल काहीच ऐकून घेणार नाही”

पुणे | गेल्या काही दिवसांपासून अजितदादा विरुद्ध चंद्रकांतदादा असा वाद पेटल्याचं चित्र महाराष्ट्रभरात पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप अशा वादामध्ये आता दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर सडकून टीका करताना पाहायला मिळत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

अजित पवार यांची जमीन माझ्या जमिनीला लागून नाही, त्यामुळे आमच्यात काही बांधावरचा वाद नाही, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांसोबत वैयक्तिक लढाई नसल्याचं सांगितलं आहे. पण “माझ्या पक्षाबद्दल आणि मोदींबद्दल जर ते टीका करत असतील आणि पक्षासाठी घातक असलेल्या गोष्टी बोलत असतील तर ते मी सहन करुन घेणार नाही”, असं देखील त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं.

दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे अजितदादामुळे सरकार पडल्यामुळे त्यांच्यावर नाराज आहेत. अशा चर्चा होत असताना अशा प्रकारची नाराजगी अजितदादांवर नाही, तर दगा दिल्यामुळे शिवसेनेवर राग आहे, असं उघडपणे शिवसेनेबद्दल बोलून दाखवलं आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अजित पवार बोलतात तेव्हा त्यांना उत्तर देणं हे गरजेचं आहे, असं म्हणत त्यांनी मी स्वतःहून वादामध्ये पडत नाही किंवा काही टीका करत नाही पण ते जेव्हा बोलतात त्याला मात्र मी प्रत्युत्तर देतो, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या –

#कोरोना! घरी वाफ घेत असाल तर थांबा, आरोग्य मंत्रालयाच्या नव्या गाईडलाईन्स

अबब! स्वच्छतागृहात तब्बल साडेसहा फुटाचा नागोबा पाहून पोलिसाच्या तोंडचं पळालं पाणी 

कोल्हापूरनंतर आता ‘या’ जिल्ह्यात धडकणार मराठा क्रांती मोर्चा

“अंगणवाडी सेविका प्रशासनाचा कणा आहेत, तिसरी लाट आली तर तुमची मदत हवी”

मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठा आरक्षणासंदर्भात उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेणार भेट

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More