मुंबई | कोल्हापुरचे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक सांगतात… सभागृहात दोन व्यक्ती आल्या की मला खूप आनंद होतो, एक नरेंद्र मोदी आणि दुसरे रामदास आठवले…! असं चंद्रकांत पाटीलांनी म्हणताक्षणी प्रेक्षकांनी तुफान टाळ्यांनी त्यांना प्रतिसाद दिला.
केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मुंबईत मेळावा झाला. हा मेळावा एका वेगळ्या कारणासाठी लोकांच्या चर्चेत राहिला.
कार्यक्रम रामदास आठवलेंचा, उपस्थिती चंद्रकांत पाटलांची आणि टाळ्या मात्र कोल्हापुरचे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिकांना…. अशी काहीशी परिस्थिती मुंबईच्या आरपीआयच्या मेळाव्यात पाहायला मिळाली.
लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम अगदी काही आठवड्यांवर आलेला असताना आरोप प्रत्यारोपांच्या काळात राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन नेते अशा प्रकारे मैत्री जपतायत, ही नक्कीच सगळ्यांसाठी सुखावणारी बातमी आहे.
महत्वाच्या बातम्या-
–…तर व्हॉटसअॅप भारतातील सेवा बंद करणार; व्हॉटसअॅपचा राजकीय पक्षांना इशारा
–भारताचा ‘हा’ माजी दिग्गज क्रिकेटपटू भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात?
-तेलतुंबडेंच्याविरोधातील कारवाई थांबवा, 600 परदेशी विचारवंताची सरकारकडे मागणी
–नासाने उलगडलं पुणेकरांच्या बुद्धीमत्तेचं रहस्य!
–“प्रितम मुडेंना टक्कर देणारा उमेदवार आहे काय?”