आम्ही झोपेत दिलेला शब्दही पाळतो- चंद्रकांत पाटील

आम्ही झोपेत दिलेला शब्दही पाळतो- चंद्रकांत पाटील

कोल्हापूर | आम्ही झोपेत दिलेला शब्दही पाळतो, त्यामुळे धनगर समाजाची फसवणूक होणार नाही, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. ते कोल्हापूरच्या दसरा चौकात आयोजित धनगर मेळाव्यात बोलत होते. 

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात भाजप सकारात्मक आहे. तसेच यासंदर्भात सरकारची पावलं योग्य दिशेने पडत आहेत, असं त्यांनी यावेळी सांगितलं. 

धनगर समाजाबद्दल असलेल्या आदरामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात राम शिंदे आणि महादेव जानकर या दोन नेत्यांना कॅबिनेट मंत्री बनवण्यात आलं, तर दुसरीकडे धनगर आरक्षणाचा केंद्र सरकारकडेही पाठपुरावा व्हावा यासाठी डॉ. विकास महात्मे यांना राज्यासभेची खासदारकी देण्यात आली, असंही ते म्हणाले.

Google+ Linkedin