11 डिसेंबरपूर्वी राणे मंत्री होणार, खडसेंचं बघू- चंद्रकांत पाटील

मुंबई | महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांचा राज्य मंत्रिमंडळातील प्रवेश अखेर ठरला आहे. 11 डिसेंबरपूर्वी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिलीय. 

राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावर शिवसेनेनं भाजपला तंबी दिली आहे. मात्र शिवसेना याबाबत मदत करेल, असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला. पंढरपुरात कार्तीकी एकादशीच्या शासकीय पूजेनंतर ते बोलत होते. 

दरम्यान, भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशावर त्यांनी गोलमाल उत्तर दिलं. शहा आणि फडणवीस यांच्या बैठकीत याबाबत लवकरच निर्णय होईल, असं ते म्हणाले.