Top News महाराष्ट्र मुंबई

खडसेंनी बंद खोलीत आमच्या दोन थोबाडीत मारल्या तरी हरकत नाही, पण…- चंद्रकांत पाटील

मुंबई | एकनाथ खडसे हे आमचे पालक आहेत. बंद खोलीत त्यांनी आमच्या दोन थोबाडीत मारल्या तरी हरकत नाही. त्यांनी प्रत्येकवेळी बोलण्यासाठी दांडे वापरू नयेत, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

खडसे राष्ट्रवादीत जाणार आहेत, अशी चर्चा तुम्हीच करता, पण ते पक्षाचे नुकसान होईल असे काहीही करणार नाहीत, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

आजच्या कार्यसमितीच्या बैठकीला ते पूर्णवेळ हजर होते. राष्ट्रगीत आटोपूनच गेले. तुम्ही पत्रकार त्यांना इकडेतिकडे ढकलता, पण ते पाय रोवून खंबीरपणे भाजपमध्येच आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

“गरीब-दलित वर्गाने आज एक बुलंद राजकीय आवाज गमावला”

रामविलास पासवान यांचं निधन हे माझं वयैक्तिक नुकसान, मी माझा मित्र गमावला- नरेंद्र मोदी

दुर्बल घटकांसाठी लढणारा नेता हरपला- उद्धव ठाकरे

ABVPच्या कार्यकर्त्याच्या कंपनीकडे DGIPRच्या सोशल मीडिया कॅम्पेनची जबाबदारी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या