पतंगराव आणि जयंतरावांनी आपापल्या जागा सांभाळाव्यात!

सांगली | पतंगराव आणि जयंतराव यांनी आपापली विधानसभेची जागा सांभाळावी, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. माजी आमदार दिनकर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

सांगली महापालिका निवडणुकीला अद्याप 6 महिन्यांचा अवधी आहे. मात्र या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासून राजकीय धुळवडीला सुरुवात झालीय. 

भाजपने आजवर भल्या-भल्या निवडणुका जिंकून दाखवल्या आहे. त्यामुळे सांगली महापालिका निवडणूक ही ‘किस झाड की पत्ती’ असंही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. भाजपने तासगाव, इस्लामपूर, कडेगावमध्ये जिंकलेल्या निवडणुकांचा संदर्भही त्यांनी यावेळी दिला.