सांगली | रोज सुमारे 5 लाख लोक जात असलेल्या रस्त्यावर 5 जणांचा मृत्यू झाला तर रस्त्याला कसा दोष देता येईल?, असा संतापजनक सवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विचारलाय. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.
मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे मुंबई महापालिकेने दुरुस्त करायचे आहेत. आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करुन घेत आहोत, असं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, पाऊस सुरु झाला की रस्त्यांवर खड्डे पडणं सुरु होतं, असं म्हणत त्यांनी एकप्रकारे रस्त्यांची निकृष्ट कामं झाल्याचं अमान्य केलं. चंद्रकांत पाटलांच्या असंवेदनशील वक्तव्यामुळे त्यांच्यावर आता टीकेची झोड सुरु झालीय.
महत्त्वाच्या बातम्या–
-भिडेंना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी होती- अजित पवार
-लॉर्ड्सवर भारतीयांचा कल्ला; घुमला ‘मेरे देश की धरती’ आवाज!
-भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात त्यानं चक्क तिला प्रपोज केलं, पहा पुढे काय घडलं…
-गुजरातमध्ये काँग्रेसला धक्का; दोन बडे नेते भाजपमध्ये दाखल
-शिवसेनेला मोठा धक्का; विनायक निम्हण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?