हमीभाव द्यायला शरद पवारांचे हात कुणी बांधले होते का?- चंद्रकांत पाटील

कोल्हापूर | शेतकऱ्यांबद्दल कळवळा दाखवणाऱ्या शरद पवार यांनी शेतकऱ्यांना हमीभाव का दिला नाही? १५ वर्षे त्यांचे हात कुणी बांधले होते का?, असा सवाल महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलाय. ते कोल्हापुरात बोलत होते.

शेतकऱ्यांचा राजा ही पदवी जाईल अशी शरद पवारांना भीती आहे, त्यामुळे ते बेछुट आरोप करत सुटले आहेत, असंही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. शेतकरी नेत्यांना चर्चेची दारं खुली असल्याचं त्यांनी सांगितलं.