Top News पुणे महाराष्ट्र

…म्हणून भाजपचे आमदार शरद पवार यांना भेटतात, चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं खरं कारण

पुणे |  निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले नेते आणि आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत, असा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. मलिकांच्या या दाव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

आमचे कोणतेही आमदार तसंच नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात नाही, असं स्पष्ट करत आमचे नेते विकासकामांसाठी शरद पवार यांना भेटतात, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. भाजपचे काही नाराज आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांवर चंद्रकांत पाटील यांनी खुलासा केला आहे.

मतदारसंघात कामं होत नाहीयेत म्हणून भाजप आमदार पवारांच्या भेटी घेतात. याचा अर्थ त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश करायचा आहे किंवा ते भाजपवर नाराज आहेत, असा होत नाही. आपल्या मतदारसंघात कामं व्हावीत, यासाठी ते जर भेट घेत असतील तर त्यात काय चुकीचं आहे. प्रत्येक आमदाराला आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त कामं करण्याची इच्छा असते, असं पाटील म्हणाले.

शरद पवारांशी जुने संबंध अनेक जणांचे आहेत. तसंच कामांसाठी भेटी होत असतात. मतदारसंघातल्या तक्रारी घेऊन आमदार पवारांकडे जातात तसंच त्यांच्या कानावर काही प्रश्न घालतात. त्यामुळे अशी चर्चा होते आहे, या चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नाही, असं पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

“राणे भविष्य सांगणाऱ्या पक्षात, त्यामुळे पोपटासारखं तर बोलणारचं ना…”

सप्टेंबरपर्यंतच ठाकरे सरकार राहिल, भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

रामदेव बाबांची आता आयपीएलमध्ये उडी, उचलणार मोठं पाऊल?

मंत्री विश्वजीत कदम यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव

‘ऑपरेशन लोटस’ इथे शक्य नाही’, संकट काळात सोडून गेले नाही ते आता कसे जातील?- नवाब मलिक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या