मुंबई | भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री करण्याची वेळ आलीच तर शरद पवार अजितदादांना नाही तर सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलंय.
राज्यात गेल्या वर्षी भाजपाकडून करण्यात आलेल्या सत्तास्थापनेच्या अयशस्वी प्रयत्नाला वर्ष पूर्ण झालं. यांसदर्भात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कितीही गोडवे गायले तरीही गेल्या वर्षी 3 दिवसांसाठी का होईना अजितदादांनी काकांना सोडलं होतं आणि हा आता इतिहास आहे.”
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस ही दरबारी लोकांची पार्टी आहे आणि भाजपा हा सामान्य लोकांचा पक्ष आहे, अशी टीका देखील चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
“गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान मी कोथरुडला अडकलो होतो. त्यामुळे इस्लामपुरात जास्त लक्ष देता आलं नाही. नाहीतर इस्लामपुरात जयंत पाटील यांची सुट्टी केली असती मग ते केवळ तालुक्याचे नेते राहिले असते,” असा टोलाही पाटील यांनी लगावलाय.
महत्वाच्या बातम्या-
मुंबईतील पाणी कपात टाळण्यासाठी समुद्राचं खारं पाणी गोड करणार- मुख्यमंत्री
असंच काम करा, म्हणजे आम्हाला बोलावं लागणार नाही; मनसेचा शिवसेनेला टोला
राष्ट्रवादीने देवेंद्र फडणवीसांना कधीही टरबुज्या म्हटलेलं नाही, मात्र….- जयंत पाटील
शरद पवार हे 4 खासदारांचे लोकनेते; गोपीचंद पडळकर यांनी टीका
एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि पथकावर ड्रग्ज पेडलर्सचा हल्ला