महाराष्ट्र मुंबई विधानसभा निवडणूक 2019

शिवसेनेला आघाडीसोबत सरकार स्थापन करण्यासाठी शुभेच्छा!- चंद्रकांत पाटील

मुंबई | जनतेने दिलेल्या जनादेशाचा शिवसेनेला अपमान करायचा असेल आणि जर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत सरकार स्थापन करायचं असेल. तर त्यांना भाजपकडून खूप-खूप शुभेच्छा, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

राज्यातल्या राजकारणानं आता एक वेगळं वळणावर आलंय. काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याचं सांगितलं.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी शिवसैनिकच असेल, असं शिवसेनेकडून वारंवार सांगितलं जातंय. त्याचपार्श्वभूमीवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी शिवसेनेला आमच्या शुभेच्छा आणि त्यांनी त्यांचा मुख्यमंत्री करावा, असं म्हटलं आहे.

दरम्यान, आता राज्याच्या राजकारणात नव्या समिकरणांची जुळवा-जुळव सुरू झाली आहे. शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येत सरकार स्थापन करण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या