सत्ता नसल्याने भरपूर रिकामा वेळ, त्यामुळे सुप्रिया सुळे सेल्फी काढतात!

जळगाव | सत्ता नसल्यामुळे सुप्रिया सुळे यांच्याकडे भरपूर रिकामा वेळ आहे. त्यामुळे त्या रस्त्यावरील खड्डे शोधून सेल्फी काढत आहेत, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. ते जळगावात बोलत होते. 

सुप्रिया सुळेंच्या सेल्फीला आम्ही त्यांच्याच मतदारसंघातील 28 बुजवलेल्या खड्ड्यांच्या फोटोंनी उत्तर दिलं. त्या धन्यवाद म्हणाल्या. त्यावर आम्ही स्वागत आहे म्हणून त्यांचं तोंड बंद केलं, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. 

दरम्यान, 15 डिसेंबरपूर्वी महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्यासाठी चंद्रकांत पाटील सध्या प्रत्येक जिल्ह्यातील बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत.