Top News राजकारण

मुख्यमंत्रीपदासाठी सुप्रिया सुळेंना पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही, कारण…- चंद्रकांत पाटील

पुणे | राज्यात कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, अशी आशा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केली होती. दरम्यान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित होते.

आशिष शेलार यांच्या या विधानानंतर सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. यावर भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “एका पुस्तकाच्या उद्घाटनप्रसंगी त्यातला दाखल देत आशिष शेलारांनी महिलेला मुख्यमंत्री करण्याचं वक्तव्य केलं. मात्र यावेळी त्या पुस्तकाचा संदर्भ देताना त्यांचं ते वक्तव्य होतं. यामध्ये सुप्रिया सुळेंना आम्ही पाठिंबा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं का नाही करायचं हे त्यांनीच ठरवायचं.”

“महिला मुख्यमंत्री होण्यास आमचा विरोध नाही, आमचाही त्याला पाठिंबा असेल. मात्र महिला सरपंचासारखं व्हायला नको. सरपंच महिला झाली आणि गाव नवरा चालवतो,” असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लागावलाय.

महत्वाच्या बातम्या-

“कॉंग्रेस पूर्णपणे कोसळतेय; तिथे कुणीही माय-बाप उरला नाहीये!”

दिवाळीत प्रार्थनास्थळं उघडल्यामुळेच कोरोनाचे रुग्ण वाढले- किशोरी पेडणेकर

शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेणार- शिक्षणमंत्री

“मंत्रिपदाचा राजीनामा देऊन नितीन राऊतांनी बिल तपासणीसाठी इन्स्पेक्टर म्हणून बसावं”

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने निघणाऱ्या दिंड्यांना पंढरपुरात परवानगी नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या