कोल्हापूर | सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य शासनाने 154 कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे, असं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.
ग्रामीण भागातील आपत्तीग्रस्त नागरिकांना प्रतिकुटुंब 10 हजार तर शहरी भागातील नागरिकांना प्रति कुटुंब 15 हजार रुपये मदत करण्यात येणार आहे. ही मदत तातडीने वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असंं ट्वीट चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
नागरिकांच्या मदतीसाठी राज्य व केंद्र शासन सर्व मार्गाने प्रयत्न करत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी पूरग्रस्त नागरिकांना केलं आहे.
दरम्यान, कोल्हापूरमधील पूरपरिस्थिती सामान्य करण्याचे काम वेगाने सुरू आहे. शिरोळ तालुक्यात मदतीसाठी पथके पाठवण्यात आली आहेत, असंही ते म्हणाले.
पूरग्रस्तांना मदतीसाठी राज्य शासनाने 154 कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.त्यातून ग्रामीण भागातील आपत्तीग्रस्त नागरिकांना प्रतिकुटुंब 10 हजार तर शहरी भागातील प्रति कुटुंब 15 हजार रुपये मदत करण्यात येणार आहे.ही मदत तातडीने वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) August 9, 2019
#कोल्हापुर मधील पूरपरिस्थिती सामान्य करण्याचे काम वेगाने सुरू आहे. शिरोळ तालुक्यात मदतीसाठी पथके पाठविण्यात आली आहेत. नागरिकांच्या मदतीसाठी राज्य व केंद्र शासन सर्व मार्गाने प्रयत्न करत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) August 9, 2019
महत्वाच्या बातम्या-
-“महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारवर हत्येचा गुन्हा दाखल करा”
-…तरच सांगली वाचेल, पवार साहेब तुम्ही पंतप्रधानांसोबत बोला!
-राजकीय इच्छाशक्ती दाखवा, बचावकार्याचं काम दिवसरात्र चालू ठेवा- अजित पवार
-जितेंद्र आव्हाडांना वाटलं राज ठाकरेंच्या भाषणाचं आश्चर्य!
Comments are closed.