Top News विधानसभा निवडणूक 2019

भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार नाही; भाजप सत्तास्थापन करण्यासाठी असमर्थ

मुंबई |  भाजपच्या कोअर कमिटीची मॅरेथॉन बैठक अखेर संपली आहे. या बैठकीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि भाजपची कोअर कमिटी राज्यपालांच्या बैठकीसाठी राजभवन इथं दाखल झाले. यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार नाही, असं स्पष्ट केलं आहे.

भाजप आणि शिवसेनेला महाराष्ट्राच्या जनतेने जनादेश दिला होता. मात्र शिवसेना सोबत येत नसल्याने आम्ही सत्तास्थापनेचा दावा करणार नाही, असं पाटील यांनी सांगितलं आहे. ज्यांना कुणाला सत्ता स्थापन करायची आहे त्यांना आमच्या शुभेच्छा, असं पाटील म्हणाले. शिवसेनेला आमच्या शुभेच्छा आणि त्यांनी त्यांचा मुख्यमंत्री करावा, असं गिरीश महाजन म्हणाले आहेत.

भाजपची कोअर कमिटीची बैठक संपताच काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवनात दाखल झाले.  आणि त्यानंतर आम्ही राज्यपालांना सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याचं सांगितलं आहे, असं पाटील म्हणाले.

दरम्यान, आता शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येत सत्तास्थापन करू शकतात, अशा शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या