“दिशा सालियन प्रकरणाचा लवकरच उलगडा होणार, सर्व पुरावे तयार”
कोल्हापूर | दिशा सालियनने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली. अभिनेता सुशांत सिंह राजपूतला हे सत्य कळाल्याने त्याची देखील हत्या करण्यात आली, असा खळबळजनक दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला होता.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सचिन वाझेचा संबंध असल्याचा संशय भाजप नेते नितेश राणे यांनी व्यक्त केला. त्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे.
7 मार्चनंतर दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होणार असून यासंबंधीचे सर्व पुरावे तयार असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होऊ नये यासाठीच शिवराळ भाषा सुरू आहे, असा घणाघात देखील चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, 8 जून 2021 रोजी सुशांत सिंह राजपूतची पूर्व मॅनेजर दिशा सालियनने आत्महत्या केली होती. त्यानंतर 14 जून 2021 रोजी सुशांतने आत्महत्या केली होती. मात्र, या घटनेवरून अजूनही राजकीय आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत.
थोडक्यात बातम्या-
दारू पिण्याचं वय केलं कमी, राज्य सरकारचा मोठा निर्णय
उर्फी जावेदचे ‘या’ दिग्दर्शकावर गंभीर आरोप, म्हणाली…
“उद्धव ठाकरे स्वत: दारू पित नाहीत, मग जनतेला वाईन का पाजत आहेत?”
दिशा सालियनला ‘त्या’ रात्री घेऊन गेलेली ती गाडी सचिन वाझेची?, नितेश राणेंचा गौप्यस्फोट
… तर कोरोनाची आणखी एक लाट येईल, कोविड टास्क फोर्स अधिकाऱ्यांनी दिली धक्कादायक माहिती
Comments are closed.