बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रॉमिस तोडलं म्हणणाऱ्या मेधा कुलकर्णींना चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई |  विधान परिषद निवडणुकीवरून भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. संधी न मिळाल्याने एकनाथ खडसे आणि मेधा कुलकर्णी यांनी पक्षाला काही सवाल केले. याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी कुलकर्णी यांना उत्तर दिलं आहे.

माझं तिकीट, माझा मतदारसंघ असं काही नसतं. दुर्देवाने भाजपमध्ये माझं तिकीट हा शब्द खूप विकसित झालाय. पार्टीने मेहनत करून पक्ष वाढवलेला असतो. त्यावेळी उपलब्ध असणाऱ्यांमध्ये तुम्ही चांगले असता म्हणून पक्ष तुम्हाला संधी देतो. तुमच्या जागी दुसरा व्यक्ती चांगला असेल तर पक्ष त्यांना संधी देतो, असं पाटील म्हणाले.

मेधा कुलकर्णी यांना विधानपरिषदेचं आश्वासन देऊनही तिकीट का मिळालं नाही याबाबतची विचारणा केली. त्यावेळी पाटील यांनी न्याय आणि अन्यायाची व्याख्या सांगत कुलकर्णी यांना मेसेज देण्याचा प्रयत्न केला.

ज्यावेळी तुम्ही नाराज होता त्यावेळी काहीतरी तरू, असं पक्षाच्या वतीने तुम्हाला सांगितलं जातं. तसं करण्याचा तो एक प्रयत्न असतो. मात्र एकाला न्याय द्यायचा म्हटल्यावर दुसऱ्यावर अन्याय होतोच, असंही पाटील म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

भारतातला कोरोना मृत्यूदर जगात सर्वांत कमी- आरोग्यमंत्री

पंतप्रधान मोदींच्या आर्थिक पॅकेजनंतर शेअर बाजार उसळला…!

महत्वाच्या बातम्या-

15 हजार पेक्षा कमी पगार असणाऱ्यांना मोदी सरकारकडून मोठी घोषणा

मध्यम, कुटीर, लघु उद्योगांसाठी निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

एकनाथ खडसेंना तिकीट का नाकारलं?, चंद्रकांत पाटलांनी सांगितलं खरं कारण…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More