बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आम्ही जर रयत संघटना आणि इतरांना मान देऊ शकतो, तर…- चंद्रकांत पाटील

नाशिक | आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट झाली. त्यांच्यामध्ये नाशिक विश्रामगृहाच्या बाहेर तब्बल 15 मिनिटे चर्चा झाली. त्यांच्या या भेटीनंतर राज्यात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. अशातच चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यात आणि राज ठाकरे यांच्यात झालेल्या या भेटीचा खुलासा केला आहे.

राज ठाकरे यांच्यासोबत माझी केवळ सदिच्छा भेट झाली असून, आमच्याच कोणत्याही प्रकारच्या युतीबद्दल चर्चा झाली नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. ते नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजप आणि मनसेची युती होणार का?, असा सवाल चंद्रकांत पाटलांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी राज ठाकरे हा आश्वासक चेहरा आहे. जर त्यांनी परप्रांतीय विरोधातील भूमिका बदलली तर नक्कीच स्वागत करु आणि तरच आम्ही सोबत येऊ शकतो, असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं. त्याचप्रमाणे मनसे सोबत युती ही चर्चा असून निर्णय मात्र पक्ष मंथन करून घेतो. सध्या तरी कोणालाही सोबत घेण्याचा विचार नाही. आम्ही मुसलमान विरोधी नाही. परंतू त्यांचं लांगुलचालन करत नाही. रयत, जानकर, आरपीआय सोबत आहेतच, असं त्यांनी म्हटलंय.

राज ठाकरे यांनी मला सांगितलं की त्यांच्या उत्तर भारतीय भाषणांचा विपर्यास झाला. त्याची लिंकही ते मला पाठवणार आहेत. आम्ही जर रयत संघटना आणि इतरांना मान देऊ शकतो, तर राज ठाकरे हे मोठं नेतृत्व आहे. राज ठाकरे यांच्याबाबत भाजप कोअर टीम निर्णय घेईल, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

थोडक्यात बातम्या-

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीचा आणखी एक धक्का!

लोकांना तीन-तीन वेळा इशारा दिला होता पण…- किशोरी पडणेकर

“…अन्यथा मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही”

नरेंद्र मोदींसोबत झालेल्या भेटीत काय चर्चा झाली?, शरद पवार म्हणतात…

पुढील 24 तासात ‘या’ भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More