बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आमची छाती फाडली तरी रामच दिसतील; आम्हाला दिखावा करण्याची गरज नाही”

मुंबई |  आमची छाती फाडली तरी रामाशी नातं दिसतं, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येत जाऊन रामाशी असलेलं नातं दाखवावं लागतं, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

उद्धव ठाकरे अयोध्येला जात आहेत त्याचं स्वागत करतो. राम हे आमचे पूर्वज आहेत, श्रद्धेचा विषय आहेत. मात्र, आता काँग्रेसलाही प्रभूराम मान्य होत असतील तर आनंदच आहे. मात्र, त्यांना रामावरील श्रद्धा दाखवावी लागते, असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.

आमच्या प्रभूराम सर्वत्र विलिन आहेत. आम्हाला अयोध्येला जाण्याचा सोहळा करावा लागत नाही. आमच्या आत प्रभूरामच आहेत, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडीच वर्षाच्या काळात तिसऱ्यांदा अयोध्यावारी करत आहेत. तसेच मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदा अयोध्येला गेले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेल्यापासून शिवसेनेवर हिंदूत्व सोडल्याची टीका होत होती. या पार्श्वभूमीवर त्यांचा अयोध्या दौरा महत्वाचा मानला जात आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

YES बॅंकेवर निर्बंध येण्याआधी गुजरातच्या कंपनीनं काढले 265 कोटी!

भारतात मुस्लिमांच्या जीवाला धोका- अयातुल्ला खामेनी

महत्वाच्या बातम्या-

“नारायण राणे हे भाजपचे बकरे बनले आहेत”

योगी आदित्यनाथ सरकारकडून उद्धव ठाकरेंना ‘गार्ड ऑफ ऑनर’चा मान!

ठाकरे सरकारच्या 100 दिवसांचा लेखाजोखा पाहा 111 सेकंदात; पाहा व्हिडीओ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More