“आमच्या आंदोलनामुळेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी”
पुणे | भारतीय जनता पक्षाच्या धरणे आंदोलनामुळे ठाकरे सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी घोषीत केला, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी आम्ही आंदोलन उभे केले. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. त्यामुळे आमच्या आंदोलनाचा हा अर्धा विजय आहे, असंही पाटील म्हणाले आहेत.
अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना आश्वासन दिल्याप्रमाणे मदत मिळावी आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा या मागण्या शिल्लक आहेत. त्यामुळे आमचं आंदोलन सुरुच राहणार आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचं दोन लाख रुपयांपर्यंतचं कर्जमाफ केलं आहे. शिवाय दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असणाऱ्यांना मदत करणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन निधी देणार असल्याचं म्हटलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
अखेर सरपंचाची ग्रामपंचायत सदस्यांमधूनच होणार निवड; राज्यपालांनी केली स्वाक्षरी
मुख्यमंत्रिपद सांभाळणं उद्धव ठाकरेंचं काम नाही; चंद्रकांत पाटलांची विखारी टीका
महत्वाच्या बातम्या-
‘एकतर हे माध्यम सोडून द्यावं, अन्यथा…’; सोनालीच्या ट्विटला प्रतिसाद देताना जितेंद्र संतापला
उद्धव ठाकरेंसोबत काँग्रेस नेतेही घेणार रामलल्लांचं दर्शन!
“उद्धव ठाकरेंनी सुभाष देसाई किंवा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायला हवं होतं”
Comments are closed.