शिवसेनेसोबत खासगीत युतीची चर्चा; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

मुंबई | आगामी निवडणुकीत युती करावी म्हणून शिवसेनेसोबत खासगीत चर्चा सुरू आहे, असा गौप्यस्फोट महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

येणाऱ्या निवडणुका शिवसेना भाजपने एकत्र लढवायच्या आहेत, असा प्रस्तावही शिवसेनेला दिला आहे, असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

दरम्यान, येणाऱ्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्षष्ट केलं आहे. त्यासाठी त्यांनी तयारीही सुरू केली आहे. शिर्डीतील दौऱ्यातून श्रीगणेशाही केला आहे.

त्यामुळे भाजपच्या जेष्ठ नेत्यानं असं विधान केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-जलयुक्त शिवारचे साडे सात हजार कोटी कुठं गेले?; अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

-दुष्काळ सदृश्य, राजा अदृश्य; विखे-पाटलांचा फडणवीसांवर हल्लाबोल

-शिवेंद्रसिंहराजेंवर अन्याय झाल्यास मी सहन करणार नाही- उदयनराजे

-सत्तेसाठी भुकेलेले भाजप नेते पर्रिकरांना आरामही करू देत नाहीत!

-शरद पवार आणि राज ठाकरेंचा एकाच विमानातून प्रवास; आघाडीसाठी खलबतं?

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या