Top News पुणे महाराष्ट्र

“शरद पवारांनी धनंजय मुंडेंची पाठराखण करू नये”

पुणे | राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्माने केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे केलेल्या खळबळ उडाली आहे. मात्र त्यानंतर मुंडेच्या रजानाम्याची मागणी धनंजय मुंडेंनी केली होती. मात्र रेणूवर आणखी दोन नेत्यांनी ब्लॅकमेल केल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मुंडेंचा तूर्तास राजीनामा घेणार नसल्याचं म्हटलं होतंं. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांकडे मागणी केली आहे.

रेणू शर्मा प्रकरणाची चौकशी व्हावी. ती कोणत्याही यंत्रणेमार्फत करा त्याबाबत आमचं काही मत नाही. मात्र रेणू शर्मा प्रकरणात धनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी म्हणून स्वत: राजीनामा द्यावा. तसे न झाल्यास पक्षप्रमुख म्हणून शरद पवार यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

आजपर्यंत देशाच्या राजकारणात ज्या ज्या वेळी लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत त्या-त्या वेळी सबंधित मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. त्यास मुंडे हे अपवाद ठरू नयेत, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रेणू शर्मांबाबत स्वत: मुंडे यांनी कबुली दिली आहे. ती माहिती त्यांनी निवडणूक लढविताना जाहीर केली नव्हती. ही गंभीर बाब असल्याचंही पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज होणार जाहीर!

…म्हणून ‘या’ गावात निवडणुकीचा निकाल पाहायला गावकरीच उरले नाही

“…त्याच गोस्वामी टोळीनं राष्ट्रीय सुरक्षेचे धिंडवडे काढून भाजपचं तोंड काळं केलं”

“शरद पवार यांच्या हृदयावरील ‘ही’ जखम भरून काढा”

‘2019 च्या सत्तास्थापनेची अजित पवारांशी नाही तर….’; फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या