बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर राज्य केंद्राच्याच ताब्यात देऊन टाका’; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला टोला

मुंबई | मागील दीड महिन्यांपासून महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. एकीकडे राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. तर दुसरीकडे लसीकरणावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष पेटला आहे. लस वितरणाच्या बाबतीत केंद्र सरकार महाराष्ट्रासोबत दुजाभाव करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

महाविकास आघाडी प्रत्येक समस्येला केंद्राला जबाबदार धरत असेल तर त्यांनी राज्य तरी का चालवावं. त्यांनी राज्य हे केंद्राच्याच ताब्यात देऊन टाकावं. मी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी असं म्हणतं नाही. पण आता तुम्ही राष्ट्रपती राजवट लागू न करण्यासाठी शिल्लक तरी काय ठेवलं आहे?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

आगामी काळात पुन्हा दोन तीन मंत्र्याना राजीनामा द्यायची वेळ येईल, असं पाटील म्हणाले. मी अमित शहा किंवा तपास यंत्रणेच्या संपर्कात आहे म्हणून मला ही माहिती मिळते आहे असं नाही, तर हा महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांचा आवाज आहे. सचिन वाझे महाविकास आघाडीला प्रिय आहेत, असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला लगावला.

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही आतंकवादी संघटना आहे का? लातूरची परिस्थिती असो की कोल्हापूरचा पूर प्रत्येकवेळी संघाने मदत केली आहे. तुमच्या राजकीय वादात संघाला ओढू नका, असंही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

धोनीनं दिला ‘तो’ सल्ला अन् नटराजनचं नशिबच बदललं

धक्कादायक!! कोरोनाबाधित महिलेवर कोव्हिड सेंटर बाहेर फुटपाथवर झोपण्याची वेळ

कोरोना लस घेतल्यानंतर ‘या’ गोष्टी टाळा; तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला

स्वप्ना पाटकर प्रकरणारुन तृप्ती देसाई संजय राऊतांविरोधात आक्रमक, म्हणाल्या…

कोरोना लसींंच्याबाबतीत महाराष्ट्रावरच अन्याय का? – आरोग्य मंत्री राजेश टोपे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More