Top News

“…तर चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा”

पुणे | भाजपने पुणे पदवीधर मतदारसंघाची हातातली जागा गमावली तर चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, असं वक्तव्य शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी केलं आहे.

पुणे पदवीधर मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यानुसार आता निकालांचा पहिला कल येण्यास सुरुवात झाली आहे. निकाल येण्यास जवळपास 40 तास लागतील असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला

मतमोजणीच्या पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. तर भाजपचे संग्राम देशमुख पिछाडीवर आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते पुरुषोत्तम बरडे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान, निकाल येण्यापूर्वीच महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या विजयाचे फ्लेक्स पुण्यात झळकले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

‘…त्यामुळे जास्त उडू नकोस, मी कंगणा राणावत आहे’; शेतकरी आंदोलनावरुन कंगणा-दिलजीतमध्ये जुंपली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अबोल असले तरी चतुर आहेत- शरद पवार

कंगणा राणावतचं ट्विटर हँडल बंद करण्यात यावं यासाठी हायकोर्टात याचिका दाखल!

खळबळजनक! मुंबईत 2 लेकींची हत्या करून वडिलांनी संपवलं आयुष्य

सोलापूरच्या शिक्षकाला 7 कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या