बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुम्ही फक्त जामिनावर सुटलात, जोरात बोलू नका नाहीतर महागात पडेल”

मुंबई | ममता बॅनर्जी झाशीच्या राणी प्रमाणे लढल्या. मै अपना बंगाल नहीं दुंगी अशी प्रतिज्ञा ममता यांनी केली होती. मोदी, अमित शाह यांच्या एक दिवसआड सभा होत होत्या. 8 ते 10 मंत्री ठाण मांडून बसले होते पण उपयोग झाला नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळांनी भाजपवर सडकून टीका केली होती. यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री छगन भुजबळांना इशारा दिला आहे.

छगन भुजबळांनी पंढरपूरवर प्रतिक्रिया द्यावी, जामिनावर सुटलेला आहात, तुम्ही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यामुळं तुम्ही फार जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळांना दिला आहे.

छगन भुजबळांना बोलायचं असेल पंढरपूर, आसाम, पुद्दुचेरीवर बोला, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळांना लगावला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता जिंकल्या तर ईव्हीएम बरोबर आहे आणि आसाममध्ये भाजप जिंकली तर ईव्हीएम चूक आहे, असं होत नाही. बंगालमधील पराभवाचं दु:ख तर वाटणारच, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

काँग्रेस आणि डाव्यांनी तृणमूलच्या पारड्यात आपली मतं टाकली. देशात आता भाजप विरुद्ध सगळे अशी स्थिती आहे. भाजप विजयी झाला की प्रामाणिकपणे कारभार होणार आणि तुमची प्रकरणं बाहेर काढणार ही भीती असते. त्यामुळं काहीही करा पण भाजपला पराभूत करा हाच फंडा पश्चिम बंगालमध्ये चालला, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

अटीतटीच्या लढतीमध्ये ममता बॅनर्जींनी मारलं मैदान; नंदीग्राम जिंकलं!

“अजित पवांरांना शोधा, तुमच्या घरात शिरून भाजपने तुम्हाला ठोकलंय”

“पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही; सांगा आता कुणी केला करेक्ट कार्यक्रम”

चांगली दाढी करा आणि करून ठेवलेल्या चुका दुरूस्त करायला लागा- प्रकाश राज

…म्हणून पश्चिम बंगालमध्ये भाजपचा झाला पराभव- चंद्रकांत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More