महाराष्ट्र मुंबई

अरे काय चाललंय काय?, महाराष्ट्रातील नैतिकता संपली का?- चंद्रकांत पाटील

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माने सर्व आरोप मागे घेतले आहेत. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धनंजय मुंडे आणि सरकारवर निशाणा साधला आहे.

तुम्ही शरिरसंबंध होते हे मान्य करता. हे भारतीय परंपरेत बसतं? हिंदू कायद्यात दोन बायकांना परवानगी आहे? मुल न दाखवण्यालाही परवानगी आहे? जणू काही क्लीन चीट मिळाली असे ढोल वाजवले जात आहेत, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केलीये.

महाराष्ट्राच्या राजकारणात एखाद्या भयानक गोष्टीला सुद्धा बाजूला कसं ढकलता येईल आणि आपण कसे क्लीन आहोत हे दाखवण्याचा जो प्रय़त्न आहे तो निंदनीय आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतली म्हणजे ते निर्दोष आहेत, त्यांना क्लीन चीट द्या, बदनामी झाली असं दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अरे काय चाललंय काय? महाराष्ट्रातील नैतिकता संपली का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केलाय.

थो़डक्यात बातम्या-

“विरोधी पक्षाने मुद्दा उचलल्याने मला वाटलं की मी मोठ्या राजकीय षडयंत्राचा बळी होत आहे”

सीरमला लागलेल्या आगीत एक हजार कोटींचं नुकसान झालं- आदर पुनावाला

‘…तर काँग्रेस पुढच्या वेळी सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही’; ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याचं मोठं वक्तव्य

सीरमच्या आगीमागे घातपात होता की अपघात हे चौकशीनंतर कळेल- उद्धव ठाकरे

“आमची भीती खरी ठरली, गंभीर विषय सत्तेच्या शक्तीसमोर दाबण्याचा प्रयत्न तर झाला नाही??”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या