पुणे महाराष्ट्र

‘भाजप हवेत चालणारा पक्ष असेल तर राष्ट्रवादी…’; चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला टोला

पुणे | राष्ट्रवादीला फुकटची सत्ता मिळाली आहे, नाही ते आरोप करुन डोक्यात जाऊ नका. तुम्ही जर नम्रपणे वागलात तर सर्व गोष्टी मार्गी लागतील, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

भाजपविषयी उघडपणे बोललेलं यापुढे सहन करणार नाही, असा इशारा चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी कॉग्रेसला दिला आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

भारतीय जनता पार्टी हवेवर चालणारा पक्ष असेल तर राष्ट्रवादी कॉग्रेस हा झोपेत चालणारा पक्ष आहे, त्यांना झोपेमध्ये स्वप्न पडतात, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, मागच्या सरकारच्या काळात महावितरण फायद्यात चालले होते. त्यावेळी महावितरणने इनकम टँक्स भरला आहे. आताच्या राज्य सरकारला वीज बिलाबाबत लोकांना न्याय देता येत नाही आणि भाजपवर आरोप केले जात आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पुन्हा एकदा एअर स्ट्राईक; दहशतवाद्यांचे अनेक बंकर्स उद्ध्वस्त

सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागं करण्यासाठी राज्यात वीजबिलांच्या होळीचं आंदोलन करणार- चंद्रकांत पाटील

“शेतकऱ्यांनी थकबाकी भरल्यास 50 टक्के वीजबिल माफी मिळणार”

25 वर्ष सत्तेची बोरं चाखलेले आता शड्डू ठोकतायत- किशोरी पेडणेकर

वीजबिल भरू नका, काय होतं ते पाहू पुढे- बाळा नांदगावकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या