महाराष्ट्र सांगली

लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना पिंगा घालायला लावला- चंद्रकांत पाटील

सांगली | लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना आम्ही पिंगा घालायला लावला, असं खळबळजनक वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते सांगलीत एका कार्यक्रमात बोलत होते.

आम्ही शरद पवारांचे सर्व बालेकिल्ले उध्वस्त केले असून लोकसभा निवडणुकीत आम्ही पवारांना जेरीस आणलं, मात्र ते थोडक्यात वाचले, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी पवारांवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसने बहुजन समाजाला भाजपपासून दूर ठेवलं. भाजप हा ब्राह्मणांचा पक्ष असल्याचं लोकांच्या मनात बिंबवलं, अशी टीका करत चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसही निशाणा साधला आहे.

काँग्रेसने वर्षानुवर्षे भाजप पक्षाचा बागुलबुवा उभा करुन बहुजन समाजाचे समाजाचे नुकसान केले, असा आरोपही पाटलांनी काँग्रेसवर केला आहे.

महत्वाच्या बातम्या

-पृथ्वीराज चव्हाणांनी माझी काळजी करण्यापेक्षा काँग्रेसची करावी- राधाकृष्ण विखे

-केजरीवाल सरकारने घेतला गरीब विद्यार्थ्यांसाठी ‘हा’ मोठा निर्णय

-‘या’ कारणासाठी शोएबला विश्वचषकातून दाखवला बाहेरचा रस्ता!

-विराटकडून आयसीसीच्या नियमाचं उल्लंघन; भरावा लागला ‘इतका’ दंड

-राष्ट्रवादीच्या कपटनीतीला मी बळी पडलो- आढळराव पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या