पुणे महाराष्ट्र

‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला

पुणे | भाजपवर टीका करणं ही संजय राऊत यांना नेमून दिलेली ड्युटी आहे. भाजपवर टीका करताय त्यामुळेच संजय राऊत यांचं पद टिकून आहे, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊतांवर निशाणा साधलाय.

संजय राऊत यांनी आज शरद पवार हेच सरकार चालवत असल्याचं मान्य केलं. तर महाविकासआघाडी सरकारच्या एका वर्षातील कारभाराला जनता शून्य गुण देईल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

मुख्यमंत्री हे कारभार चालवण्यासाठी शरद पवार यांचा सल्ला घेतात, हे अखेर संजय राऊत यांनी मान्य केले. आता मुख्यमंत्र्यांनी शरद पवार काय अगदी पार्थ पवार यांचाही सल्ला घ्यावा, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

दरम्यान, मराठा आरक्षणावर महाविकाआघाडी सरकारमधील नेते काहीही बोलतात. त्याऐवजी सरकारने तज्ज्ञांची मते जाणून घ्यायला पाहिजेत. तसेच सरकारचा कारभार उत्तम सुरु आहे किंवा नाही, हे जनतेलाच विचारा, असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिलंय.

महत्वाच्या बातम्या-

…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ

“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”

‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’

“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”

“…तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या