महाराष्ट्र मुंबई

“ठाकरे ब्रँड हे काय नवीन काढलंय?, राज्यात एकच ब्रँड ते म्हणजे…”

मुंबई | महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड हे काय नवीन काढलं? असा सवाल करत महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराज हेच ब्रँड आहेत. त्याशिवाय कोणताच ब्रँड नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा ठाकरे हा ब्रँड आहे असं मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडलं होतं. ठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रँड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रँड पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रँडनाच नष्ट करायचे आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा एकदा उघडे पडले आहे, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी सामनातून भूमिका मांडली होती. यावरून चंद्रकात पाटील यांनी राऊत आणि शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलंय.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे. महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचाच ब्रँड आहे. त्यांच्याशिवाय दुसरा कोणताच ब्रँड नाही, असं चंद्रकात पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, मुंबई असो की, महाराष्ट्र एकच ब्रँड, छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणत भाजप आमदार नितेश राणेंनी शिवसेना नेते संजय राऊत यांना फटकारलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘बॉलिवूडशी नातं सांगणारे वांद्रे पूर्वेला राहतात’; शेलारांचा आदित्य ठाकरेंना टोला

“मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अनाकलनीय”

व्यंगचित्रावरुन आता शिरुरमध्येही राजकारण तापलं; शिवसेना-राष्ट्रवादीत स्टेटस वॉर सुरु!

“देवासारख्या नेतृत्वावर कोण टीका करत असेल तर सहन करणार नाही”

नागपूरात आता मास्क न वापरल्यास भरावा लागणार इतका दंड!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या